महाराष्ट्र

कोरोना मृत्यूदर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य – मुख्यमंत्री

24 July :- राज्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या धक्कदायक आकडेवारीमूळे प्रशासनासह नागरीक सुद्धा त्रस्त आहेत.राज्यात रोज झपाटयाने कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.तर राज्यात कोरोनाच्या तावडीतून मुक्त होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहेत.विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, मृत्यूदर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे. त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत, तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आयोजित केली. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत.

धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती. तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले, असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.