क्रीडा

‘या’ तारखेस होणार IPL चा प्रारंभ!

24 July :- कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात होणारा टी-20 वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कप पुढे ढकलल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सीजनचा रस्ता मोकळा झाला आहे.

यंदाची IPL 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये सुरु होणार आहे. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे.. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली असल्याची देखील माहिती आहे.IPL व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, या बैठकीत IPL बाबत अंतिम रुपरेषा ठरणार आहे. माहिती अशीही मिळाली आहे की, बीसीसीआयने आपल्या निर्णयाबाबत फ्रेंचायजींना देखील माहिती दिली आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, पूर्ण शक्यता आहे की, IPL 19 सप्टेंबरपासून सुरु होईल आणि 8 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल. यानुसार IPL 13 सिझनचं हे आयोजन 51 दिवसांचं असेल.IPL ची तारीख ठरली असली तरी अजून किती सामने होणार आणि कुठे होणार याबाबतचं वेळापत्रक मात्र तयार झालेलं नाही. एका आठवड्याच्या आत IPL चं वेळापत्रक येण्याची शक्यता आहे. IPL कडून हे शेड्यूल लवकरच जाहीर होऊ शकतं.