बीड

कोरोनाशी झुंज अपयशी, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांचे निधन

पुणे, 24 जुलै : पुण्यात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे

ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले आहे. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्यावर  दिनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज  उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भास्करराव आव्हाड यांना काही दिवसांपू्र्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना दिनानाथ  हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.  कोरोनावर उपचार सुरू असताना  त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवले होते. परंतु, त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज आज अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्यांनी दिनानाथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

नगर जिल्ह्यातील शिराळ चिंचोडी हे भास्कर आव्हाडांचे मुळगाव होते. भास्करराव आव्हाड हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे स्नेही होते. पुण्यातील एमआयटी शिक्षण संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

राज्यातील शेकडो न्यायाधीश तयार करण्यात तसंच वकिलांना मार्गदर्शन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. दैनिक सकाळसह अनेक वृत्तपत्रात त्यांचे अनेक वैशिष्ठ्य पुर्ण लेख प्रकाशित होत होते. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांचे अनेक खटले महत्वपूर्ण ठरले होते. वयाच्या 77 व्या वर्षीही भास्कर आव्हाड हे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बोलावल्यावर वकील संघटनेला मार्गदर्शन करत होते.

त्यांच्या पश्चात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचा सदस्य असलेला एक मुलगा ॲड अविनाश आव्हाड, दोन मुली, पत्नी व दोन मुली, बंधू ॲड डॉ. सुधाकर आव्हाड आणि पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे