महाराष्ट्र

राज्यात भेटली अनेकांना कोरोनामुक्तीची पावती;मात्र रुग्णवाढ विक्रमी!

23 July :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.प्रशासनाच्या,आरोग्य विभागाच्या अहोरात्र मेहनतीनंतरही कोरोना विषाणूचे सुरु असलेलं थैमान शमल्या जात नाहीये.त्यामुळे राज्यात वारंवार लॉकडाऊन घेण्याची वेळ आली. मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. सगळे व्यापार आणि व्यवसाय बंद असल्यामुळे मोठं आर्थिक संकट नागरिकांसमोर उभं राहिलं आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.

अशा भयाण परिस्थितीमध्ये गेल्या 24 तासांत 9895 कोरोनारुग्णांचं निदान झालं. कालही दहा हजारांवर नव्या कोरोनारुग्णांचं निदान झालं होतं. 24 तासांत पाच आकडी नवे रुग्ण सापडण्याचा कालचा पहिलाच दिवस होता. आजही मोठ्या संख्येने रुग्णवाढ झाल्याने राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 3 लाख 47 502 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे. दिवसभरात 298 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आता कोरोनाबळींची संख्याही 12854 झाली आहे.

राज्यभरात उपचार सुरू असलेले तब्बल 1,40,092 रुग्ण आहेत.दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 6484 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सुचनेचं पालन करा!