महाराष्ट्र

‘या’ शहरात सुरू होणार प्लाझ्मा बँक!

23 July :- राज्यात सर्वत्रच कोरोनाचा कहर सुरु असताना मालेगाव आणि धारावीत कोरोनाचा उद्रेक सुरु होता. मात्र राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात शासनाला अपयश आले असले तरी शासनाने प्लाझ्मा थेरेपीच्या सहाय्याने मालेगाव आणि धारावीतील कोरोनाचा कहर आटोक्यात आणला आहे.सरकारच्या या सक्षम पावलाचे जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केलं होतं.

महाराष्ट्र सरकार प्लाझ्मा थेरेपीमुळे होणाऱ्या सकारात्मक परिणामामुळे प्रभावित झाली आहे. यासाठी ते आता धारावीनंतर मालेगाव येथे प्लाझ्मा बँक सुरू करणार आहेत. प्लाझ्मा बँकेच्या माध्यमातून सरकारचा हा प्रयत्न आहे की या दोन्ही भागातून जास्तीत जास्त प्लाझ्माचं संकलन केलं जावं.

ज्यामुळे गरजुंना प्लाझ्मा थेरेपी दिली जाऊ शकते.महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की सरकार अनेक ठिकाणी प्लाझ्मा बँक सुरू करणार आहे. मात्र प्राथमिक पातळीवर मालेगाव आणि धारावी येथे प्लाझ्मा थेरेपीअंतर्गत अधिकाधिक प्लाझ्माचं संकलन केलं जाईल. सरकार प्लाझ्मा थेरेपीअंतर्गत गंभीर संक्रमित कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे.

धारावीच्या आमदार आणि महाराष्ट्राच्या शिक्षा मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की – धारावीतील ज्यांच्या शरीरात एन्टीबॉडी तयार झाल्या आहेत त्यांना प्लाझ्मा डोनेट करायला हवा. ज्यामुळे दुसऱ्या रुग्णांचा जीव वाचवता येईल.