4 जणांच्या आत्महत्येमागे शिवसेना नगरसेवकाचा हात!
23 July :- कोरोना विषाणूच्या काहाराने राज्यभरात सध्या मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.राज्यातील अनेक नागरिक नाईलाजाने सध्या घरी बसलेले आहेत.हाती काम नसल्याने सर्व सामान्य माणसांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये सर्व सामान्य माणसाची मनोवृत्ती दिवसेंदिवस विक्षिप्त होत चालली आहे.कदाचित यामुळेच छोट्या-छोट्या कारणाने समाजात हत्या आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत.
सोलापुरातील एकाच कुटुंबातील 4 जणांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेच्या नगरसेवक लक्ष्मण जाधव यांना अटक करण्यात आली आहे. सोलापुरातील हांडे प्लॉटमधली ही घटना आहे. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे आणि उपायुक्त बापू बांगर घटनास्थळी दाखल होत प्रकरणाची चौकशी करत होते. अमोल जगताप यांनी दोन मुलं आणि पत्नीला गळफास देवून स्वतः आत्महत्या केली होती. या घटनेत आत्तापर्यंत एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेला रोजगाराचा अभाव, त्यामुळे सावकाराचं घेतलेलं कर्ज फेडतांना या कुटुंबाची ओढाताण होत होती. त्यातच सावकाराचा कर्ज फेडण्यासाठी सारखा तगादा असल्याने ते कुटुंब त्रासून गेलं होतं. त्यामुळे भविष्यात आपलं काय होईल या विवंचनेत असतानाच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता.एकाच दिवशी सर्वच कुटुंब संपल्याने परिसरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या आत्महत्येमागे इतर काही गोष्टी कारणीभूत आहेत का याचाही तपास पोलीस होते. तपासामध्ये हाती आलेल्या माहितीवरून पोलिसांनी चार जणांना अटक केली. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाचंही नाव आहे