सिनेमा,मनोरंजन

कंगनाची होणार पोलिस चौकशी?

23 July :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचा तरुण अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने नैराश्यास वैतागून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.सुशांतने केलेल्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपट सृष्टीतील वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे.सुशांतने आत्महत्या करण्यामागचे कारण हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक बड्या दिग्दर्शकांनी,अभिनेत्यांनी सुशांतची केलेली पिळवणूक असल्याचे कंगनाने अनेकदा सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले आहे.

अनेक मोठ्या प्रतिष्ठित कलावंतांची सुशांत आत्महत्या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे.इंडस्ट्रीत असलेला नेपोटिझम चर्चेत ठेवण्याचं काम कंगनाने चांगलेच सुरु केलेले आहे.मात्र तापर्यंत पोलिसांनी सुशांतच्या जवळच्या व्यक्तींसह काही सेलिब्रिटींचीही चौकशी केली आहे आणि सुशांतच्या आत्महत्येला बॉलीवूडमधील नेपोटिझम जबाबदार असल्याचा आरोप करणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतलाही पोलीस चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे.

कंगनाला मुंबई पोलिसांकडून अद्याप अशी अधिकृत नोटीस आली नसल्याचं कंगनाच्या टीमने सांगितलं.
कंगनाला कोणतीही अधिकृत नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली नाही. कंगनाची बहीण रंगोलीला गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांचा फोन येतो आहे. कंगनाला आपला जबाब नोंदवायचा आहे. मात्र आम्हाला मुंबई पोलिसांकडून काहीही प्रतिक्रिया मिळत नाही आहे. असं ट्विट कंगनाच्या टीमने केलं आहे.