राजकारण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली शिवसैनिकांना विनंती!

23 July :- राज्यात सर्वत्रच दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा कहर वाढत आहे.कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे राज्यातील सर्वच क्षेत्रात मोठे नुकसान झाले आहे.लॉकडाऊनच्या काळात रोज काम करून जगणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत.हाताला काम नसल्याने गरीब माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे.सर्वसामान्यांना रोज मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समस्त जनतेला एक विनंती केली आहे.

मुख्यमंत्री म्हणले,यावर्षी मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. त्यांनी सर्व समर्थक आणि शिवसैनिकांना विनंती केली आहे की त्यांनी वाढदिवसानिमित्त फ्लेक्स आणि होर्डिंग्स लावू नये. त्याऐवजी नागरिकांनी CM Relif Fund मध्ये दान करावं, रक्तदान शिबिरं भरवावी आणि कोरोनाग्रस्तांना प्लाझ्मा डोनेट करावा.

सध्या महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर साथीशी सामना करीत आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही केलं होतं.

कोरोना बळावू नये यासाठी घरुन काम करा, गर्दी होईल असं वागू नका…असं आवाहन वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्यातच ते यावर्षी कोरोनाच्या या कहराच्या काळात आपल्या वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जनतेला सांगितलं आहे.