क्राईम

खळबळजनक;बापानेच केला मुलीचा सौदा!

23 July :- कोरोना विषाणूच्या वादळाने केवळ लाखोंच्या संख्येमध्ये माणसांचे बळी घेतले नाहीत तर माणसांमधील शोभनीय अलंकार असलेल्या माणुसकीस सुद्धा संपवले आहे.मुलगी आणि बापाचं नातं अतिशय प्रेमाचं आणि आपुलकीच मानलं जातं.मात्र या नात्याला कलंकीत करणारा प्रकार घडला आहे.

लॉकडाऊनच्या काळात रोज काम करून जगणाऱ्या मजुरांचे हाल झाले.हाताला काम नसल्याने गरीब माणसांचे जगणे मुश्किल झाले आहे.अशा परिस्थितीत पैशामुळे बेहाल झालेल्या बापाने आपल्या चार महिन्याच्या मुलीचा पैशाअभावी 45 हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची खळबळजनक घटना आसाममध्ये घडली आहे.

तीन मुलींचा बाप असलेल्या वडिलांसमोर लॉकडाऊन आणि कोरोनामुळे मोठं संकट उभं राहिलं. लॉकडाऊनमुळे मोलमजुरी बंद झाली. अनेक दिवस कसेबसे ढकलल्यानंतर बापालाही असह्य झालं आणि पैशांसाठी अखेर आपल्या पोटच्या गोळ्याचा त्यानं सौदा केला.मागच्या 4 महिन्यांपासून एकही काम नसल्यानं दीपक ब्रह्मा या मजुरानं गुजरातमधून आसाममध्ये आपल्या मूळ गावी आला. जे हातात पैसे होते ते घरी येईपर्यंत संपले. त्यानंतर काही दिवस ढकलले मात्र दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी मुलीला विकलं याची माहिती स्थानिक एनजीओला मिळाली आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

या प्रकरणी पोलिसांनी मुलीचा सौदा केल्या प्रकरणी वडिलांना आणि खरेदी करणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात एजन्टचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.