राजकारण

बकरी ईदच्या नियमावलीवरुन इम्तियाज जलील आक्रमक

22 July :- राज्यात सर्वत्रच कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढणारी आकडेवारी लक्षात घेता या वर्षीचे सर्वच सण-उत्सव साध्या रितेने साजरी करण्याचे आवाहन शासनाने केले आहे.बकरी ईद सुद्धा मुसलीम बांधवांनी सध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

कोरोनाच्या प्रॅदुर्भावा पासून बचाव करण्याकरिता बकरी साजरी करण्यासाठी सरकारने निअमवाली जाहीर केली आहे.मात्र बकरी ईद करीत सरकारने जाहीर केलेली नियमावली एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्हाला प्रतिकात्मक बकरी ईद साजरी करा, असा सल्ला दिला जातो. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला ज्या कार्यक्रमाला जाणार आहेत, तो कार्यक्रम दिल्लीत बसून प्रतिकात्मक का केला जात नाही, असा प्रश्नही खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

खासदार इम्तियाज जलील चांगले आक्रमक झाले आहेत.बकरी ईदसाठी मशीद उघडण्यास तसेच प्राण्यांची कुर्बानी द्यायला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. मात्र, कोरोना परिस्थिती पाहता महापालिका हद्दीत सूट मिळणार नाही, असे आदेश औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिले आहेत.

यावरून नाराज झालेल्या इम्तियाज जलील यांनी बकरी ईदसाठी सरकारने केलेल्या नियमावली मान्य नसल्याचं म्हटलं आहे. नक्की कोण अधिकारी आणि काय विचार करून, असे नियम बनवतात? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.