कोरोनामुळे मृत्यूचं सत्र सुरूच;आज तिसरा बळी!
22 July :- बीड जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बीड शहरातील एका 60 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट बुधवारी पहाटे कोरोना बाधित आला होता. दरम्यान त्यांना लातूर येथे उपचारासाठी घेवून जात असताना दुपारी रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिवसभरात कोरोनामुळे तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला.
बुधवारी पहाटे या रुग्णाचा रपोर्ट कोरोना बाधित आला होता. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्याचा निर्णय कुटूंबाने घेतला. जिल्हा रुग्णालयातून
दुपारी त्यांना रुग्णवाहिकेतून लातूरला घेवून जात असताना अंबाजोगाई जवळ त्यांना अत्यावस्थ वाटू लागले.चालकाला रुग्ण अत्यावस्थ झाल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने त्यांनी रुग्णवाहिका अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केली.रुग्णालय प्रशासनाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. कोरोनामुळे दिवसभरात तिसरा मृत्यू झाला, तर आता जिल्ह्यातील एकुण कोरोनाग्रस्त रुग्णांची मृत्यू संख्या 22 वर पोहचली आहे.