सख्ख्या भावांनीच केले बहिणीच्या मृतदेहाचे तुकडे!
22 July :- कोरोना विषाणूच्या काहाराने राज्यभरात सध्या मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.राज्यातील अनेक नागरिक नाईलाजाने सध्या घरी बसलेले आहेत.हाती काम नसल्याने सर्व सामान्य माणसांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड दुरावे लागत आहे.आशा भयाण परिस्थितीमध्ये सर्व सामान्य माणसाची मनोवृत्ती दिवसेंदिवस विक्षिप्त होत चालली आहे.कदाचित यामुळेच छोट्या-छोट्या कारणाने समाजात हत्या आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत.
अशीच घटना ठाण्यातील डायघर पोलिस स्टेशन परिसरात घडली आहे.बहिणीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन वारंवार होत असलेल्या भांडणाचा शेवट निर्घृण हत्येने झाल्याने डायघर गावात एकच खळबळ उडाली आहे.
प्रतिभा प्रविण म्हात्रे (वय-29 वर्षे) असं मृत तरुणीचे नाव आहे. एप्रिल महिन्यात ती 15 दिवस घरी काही न सांगता बाहेरगावी गेली होती. ती परत आल्यावर तिला भावांनी तिला विचारले असता तिनं नीट उत्तरं न दिल्याने तिच्यात आणि भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. भांडण टोकाला जाऊन तीन सख्ख्या भावांनी लोखंडी सळईने प्रतिभाला बेदम मारहाण केली. त्यातच तिनं जीव सोडला. ही घटना कोणाला कळू नये या म्हणून तिघांनी बहिणीच्या शरीराचे तुकडे करुन तिला 1 मे च्या रात्रीच जाळून टाकले.
याबाबत कोणालाच काही माहित नसताना अचानक पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रतिभाच्या भावांची कसून चौकशी केली. तिची हत्या करुन तिला जाळून टाकल्याचं तिघांनी कबूल केलं.या प्रकरणी डायघर पोलिसांनी तिघा भावांना अटक केली असून एक भाऊ फरार आहे.