महाराष्ट्र

राज्यात पहिल्यांदाच पाच आकडी नवे रुग्ण!

22 July :- राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे.प्रशासनाच्या,आरोग्य विभागाच्या अहोरात्र मेहनतीनंतरही कोरोना विषाणूचे सुरु असलेलं थैमान शमल्या जात नाहीये.त्यामुळे राज्यात वारंवार लॉकडाऊन घेण्याची वेळ आली. मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. सगळे व्यापार आणि व्यवसाय बंद असल्यामुळे मोठं आर्थिक संकट नागरिकांसमोर उभं राहिलं आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.अशा भयाण परिस्थितीमध्ये गेल्या 24 तासांत पहिल्यांदाच पाच आकडी नवे रुग्ण सापडले आहे.

राज्यात आज पहिल्यांदाच 10576 नव्या रुग्णांची धक्कादायक नोंद झाली आहे.आणि विशेष म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी लॉकडाउन असताना ही विक्रमी नोंद झाली आहे. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 337607 3 लाख 37 हजार 607 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 12,556 वर गेला आहे.राज्यभरात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 1,36,980 एवढी आहे.

एकीकडे Covid रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं आहे.280 जणांना मृत्यू नोंदवण्यात आला आहे. दिवसभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. 5552 रुग्णांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं.तापर्यंत महाराष्ट्रात तीन लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 1,87,769 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सुचनेचं पालन करा!