लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा खुलासा!
22 July :- राज्यात सर्वत्र कोरोनाच थैमान सुरु आहे.प्रशासनाच्या,आरोग्य विभागाच्या अहोरात्र मेहनतीनंतरही कोरोना विषाणूचे सुरु असलेलं थैमान शमल्या जात नाहीये.त्यामुळे राज्यात वारंवार लॉकडाऊन घेण्याची वेळ आली. मार्च महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. सगळे व्यापार आणि व्यवसाय बंद असल्यामुळे मोठं आर्थिक संकट नागरिकांसमोर उभं राहिलं आहे.कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे.नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत.
माध्यमांशी बोलताना यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन बाबत खुलासा केला आहे.अनलॉकिंगनंतर आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.त्यामुळे आता नागरिकांना स्वतःची स्वतःहा खबरदारी घेणे गरजेचे आहे.