Popular News

थिएटर, मल्टिप्लेक्स सुरु करण्याची मागणी

22 July :- कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव रोकण्याकरिता चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स बंद आहेत.बॉलिवूडचे सर्व मोठे चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत, ज्यामुळे देशातील बड्या थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी थिएटर,मल्टिप्लेक्स मालक करीत सरकारकडे थिएटर, मल्टिप्लेक्स सुरु करण्याची मागणी आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सिनेमाला येणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वातावरण दिले जाईल आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व व्यवस्था केली जाईल, असा दावा मल्टिप्लेक्स मालक करीत आहेत.सध्या अनेक सिनेमे ओटीटी प्लाटफॉर्मवर प्रसिध्द होतायत. त्यामुळे सिंगल स्क्रिन, मल्टिप्लेक्सवाल्यांचं करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे. जोपर्यंत व्यवसाय सुरु होणार नाही तोपर्यंत या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारों कुटुंबांची उपासमार होणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेत सरकारने आमच्या व्यवसायाला सुरु करण्याची परवानगी द्यावी असं व्यवसायिकांचं म्हणणं आहे. यासाठी आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्याचा दावा व्यवसायिकांनी केलाय.


चित्रपट पाहण्याकरिता थिएटर,मल्टिप्लेक्स मध्ये येणाऱ्या ग्राहकांची काळजी अशाप्रमाणे घेण्यात येईल
1) टचलेस तिकिट काऊंटर
2) संपूर्ण चित्रपटगृहात हँड सॅनिटायझर, सॅनिटायझर मशीन
3) प्रत्येकाचे तापमान चेक करण्यासाठी तापमान मशीन
4) प्रत्येकाकडे आरोग्य सेतू अॅप अनिवार्य
5) कॅशलेस आणि टचलेस पेमेंट
6) सोशल डिस्टनसिंगसाठी दोन मीटर अंतरावर फूट मार्क
7) एक खुर्ची सोडून बसण्याची व्यवस्था
8) टचलेस टॉयलेट
9) रो वाईज एग्जिट