ऑक्सिजन मागणाऱ्या कोरोनाबाधिताचा मृत्यु
22 July :- कोरोना विषाणूच्या जीवघेण्या रोगापासून नागरिकांचे प्राण वाचविण्याकरिता दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणाऱ्या आरोग्यविभागचे करावे तेवढे कौतुक कमीच.परुंतु काही ठिकाणी मात्र आरोग्य विभागाच्या हालगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्तांना मृत्यूने कवठाळलं असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.परभणी जिल्ह्यातील शहापूर येथील 35 वर्षीय रामदास आदोडे यांच्यावर पुण्यात डायलिसीसचे उपचार सुरु होते. त्यांना 7 जुलै रोजी पुण्याहून परभणी जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले होते.
त्यांची कोरोना तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. याच दरम्यान 12 जुलै रोजी रामदास आदोडे यांनी आपले 12 दिवसांपासून डायलिसीस झाले नाही. शिवाय दवाखान्यातील ऑक्सिजनही संपल्याचा एक व्हिडीओ काढून आपल्याला काही बरे वाईट झाले तर त्याची जवाबदारी ही इथल्या डॉक्टर, नर्स, खासदार, आमदार यांची असेल असे त्यात त्यांनी नमूद केले होते.
त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर यशश्वी डायलिसीस करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. परंतु 20 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर हा व्हिडीओ सोशल माध्यमांमध्ये व्हायरल झाला आणि त्यांचा मृत्यू खरंच कोरोनामुळे झाला की डायलेसिस, ऑक्सिजन न मिळाल्याने झाला याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र तो रुग्ण गंभीर आजाराने ग्रस्त होता त्यातच त्याला कोरोनाची बाधा झाली असताना इथे त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले.
परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी कॅमेऱ्यासमोर न येता दिली. दरम्यान आदोडे यांच्या मृत्यूला इथले जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर आणि कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.