Popular News

“या” महिन्यात लोकांना उपलब्ध होऊ शकते कोरोनाची लस

जगभरातील कोरोना विषाणूच्या थैमानाने मोठे-मोठे देश हतबल झाले आहेत.कोरोना विषाणूचा वाढता कहर जगावरील सगळ्यात मोठे संकट बनला असून जगातील संपूर्ण आरोग्य विभाग,नागरिक कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले आहेत.दरम्यान आजपर्यंत कोरोनाविरुद्धच्या लढयातील सर्वात सुखद,आनंददायी बातमी समोर आली आहे.जगभरात कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी दिली आहे.

सुरुवातीला कोणतीही लस बल्कमधे (मोठ्या प्रमाणात ) बनवली जाते. त्याप्रमाणे ही लस देखील बल्कमधे बनून तयार आहे. आणखी काही प्रक्रिया झाल्या की ही लस बाटल्यांमधे भरणे सुरु करणार आहोत. या लसीच्या भारतीय लोकांवरही चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल. 1500 भारतीय लोकांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत, असं राजीव ढेरे यांनी सांगितलं.

ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून सुरु असलेले प्रयोग, भारतातील पंधराशे लोकांवर सुरू असलेल्या चाचण्या आणि कायदेशीर सोपस्कार नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते. कदाचित ही लस इंग्लंडमध्ये सुरुवातीला थोडीशी आधी उपलब्ध होऊ शकते. पण आपल्याकडे या लशीचे कोट्यावधी डोस आम्ही बनवून तयार ठेवत आहोत. त्यामुळे ती सगळ्यांना लगेच उपलब्ध होईल. मी शास्त्रज्ञ आहे आणि आतापर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयोगाची प्रगती पाहता आपण कोरोना लसीच्या 90 ते 95 टक्के जवळ पोहोचलो आहोत, असा दावा राजीव ढेरे यांनी केला आहे.

ऑक्सफर्डने पहिल्या स्टेजमध्ये केलेल्या लसीच्या मानवी परीक्षणाचे निकाल सकारत्मक मिळाले या संदर्भातील अहवाल द लॅन्सेट मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. ही लस कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. अधिकृत AZD1222 या नावाने ओळखली जाणारी हीलस जेनर इन्स्टिट्यूटने बनवली आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, जेनर इन्स्टिट्यूटची ही लस कोरोनाव्हायरस पासून दुहेरी संरक्षण प्रदान करु शकेल, ही लस शरीरात अँटीबॉडीड आणि किलर टी- सेल्स बनवण्यात मदत करु शकते. ज्यामुळे कोरोनाव्हारस विरुद्ध लढण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होईल