क्राईम

कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यानेच केला महिलेचा विनभंग!

२१ जुलै :- कोरोना विषाणूच्या कहराने त्रस्त असणारे प्रशासन आणि नागरिक सध्या अनेक संकटांना तोंड देत आहेत.देशात,राज्यात,जिल्ह्यात,शहरात सर्वत्रच कोरोनाशी लढा देत आहेत.अशा परिस्थितीमध्ये पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमधील महिला रूग्णांच्या विनयभंग प्रकरणी धक्कादायक बाब उघड झाली आहे. हा विनयभंग करणारा कर्मचारी हा सेंटरचा कर्मचारी असल्याचं उघड झालं आहे. लोकेश मते असं आरोपी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सिंहगड कॉलेज कोविड सेंटरमध्ये काल राञी 12 वाजता एका महिला पेशंट्सच्या दारावर जोरदार धक्के मारले गेल्याचा प्रकार घडला. संबंधित महिलेनं घाबरून 100 नंबरवर कॉल करून तक्रारही केली पण पोलिसांकडे पीपीई कीट नसल्याने त्यांनी कोविड सेंटरमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली. आज या पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. मात्र या निमित्ताने कोविड सेंटरमधील महिला पेशंट्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये मध्यरात्री 27 वर्षीय कोरोना बाधित महिला राहत असलेल्या रूमचा दरवाजा बाहेरून त्या व्यक्तीने जोरजोराने ठोठवल्याची घटना घडली. संपूर्ण रात्र जागूनच घाबरलेल्या अवस्थेतच त्या महिलेने काढली.

सकाळी तिने ही बाब आपल्या नातेवाईकांना फोनवरून सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्या महिलेला दुसऱ्या कक्षात इतर महिलांसोबत राहण्यास पाठविले.

सिंहगड कॉलेजमध्ये एकूण 5 हॉस्टेल प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी 1500 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 14जुलै रोजी धायरी येथील 27वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाच्या वतीने त्या महिलेस वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेज च्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.