राजकारण

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!

२१ जुलै :- आरोग्य विभागाच्या अहोरात्र मेहनती नंतरही कोरोना विषाणूचे थैमान शमल्या जात नाहीये.शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा आज करोनामुळे मृत्यू झाला. 2002 ते 2012 या काळात ते नगरसेवक होते. विजय मारटकर यांच्या घरातील 14 जण कोरोना बाधीत झाले होते. 14 जुलैला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. लक्षणे नसल्याने त्यांना प्रथम बालेवाडी येथील कोविड सेन्टर मध्ये क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचारही सुरु होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांना त्रास जाणवू लागला मग दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. नंतर त्यांची प्रकृती बिघडतच गेली आणि आज त्यांचा संघर्ष संपला.


विजय मारटकर 67 वर्षांचे होते. त्यांना ब्लड प्रेशर आणि डायबेटिजचा त्रास होता. त्यांची दोन वेळा Angioplastyही करण्यात आली होती.मारटकर यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेली 3 दिवस उपचार सुरु होते. त्याच दरम्यान त्यांच्या आजूबाजूचे 2 रुग्ण दगावले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी मंगेशकर हॉस्पिटलमधून दुसरीकडे नेण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांना केमला शिफ्ट करण्यात आलं होतं. तिथेच आज त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.