बीड

बीड प्रशासनाचा भोंगळा कारभार;१२ तासांपासून कोविड रुग्णालयात अंधार!

विशेष म्हणजे जनरेटर सुद्धा उपलब्ध नाही!

बीड -शासन एकीकडे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना बीडचे कोविड हॉस्पिटल मात्र मंगळवारी तब्बल बारा तासापासून अंधारात आहे हे विशेष या ठिकाणी जनरेटर सुद्धा उपलब्ध नसल्याने कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना घाम घाम होऊन मरण्याची वेळ आली आहे.याकडे डॉ थोरात यांचे मात्र लक्ष नाही हे स्पष्ट दिसत आहे.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात असलेले सर्व विभाग आदित्य मेडिकल कॉलेज इमारती मध्ये स्थलांतरित करून दोन्ही तिन्ही इमारती या कोविड साठी राखीव ठेवल्या आहेत .या ठिकाणी सध्याच्या घडीला पन्नास च्या जवळपास रुग्ण उपचार घेत आहेत .मंगळवारी जिल्हा रुग्णलाय परिसरात चक्कर मारली असता सकाळपासून जिल्हा रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती मिळाली .विशेष म्हणजे सकाळपासून वीज खंडित असल्यामुळे रुग्णांचे मात्र बेहाल होत आहेत .

जिल्हा रुग्णालयात अनेक कोरोना बाधित रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत,मात्र दिवसभर वीज नसेल तर या व्हेंटिलेटर काय उपयोग,जे अत्यवस्थ रुग्ण आहेत ते सुविधा नसल्याने मरतील हे निश्चित .

शासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री हे कोविड साठी अब्जावधी रुपये खर्च करत असताना बीड जिल्हा रुग्णालयात मात्र दिवसभर वीज गायब होत असेल अन याची दखल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ थोरात याना घ्यावी वाटत नसेल तर हा रुग्णांच्या जीवाशी खेळच म्हणावा लागेल