भारत

देशातील हे राज्य झाले लॉकडाऊन फ्री!

२१ जुलै :- जगभरात कोरोना विषाणूचा कहर असल्यामुळे देशातील अनेक राज्यात,जिल्ह्यात शहरात लॉकडाउन सुरु आहे.कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे मुक्त संचार करणे कठीण झालेले आहे.यामुळे सर्व सामान्य माणसांच्या हाताला काम नाहीए.आशा भयाण परिस्थितीमध्ये अर्थव्यस्था पूर्णतः कोलमडली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की – आता लोकांनी कामावर परतण्याची गरज आहे. राज्याची अर्थव्यवथाही महत्त्वाची आहे. अर्थव्यवस्था स्थिर ठेवत आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, यापुढे कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रतिबंध असतील.