भारत

लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांमुळे दिल्लीची चिंता वाढली!

21 July :- देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अशात आता लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. दिल्लीत एक दोन नव्हे तर तब्बल 47 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं नाहीत. सिरो सर्व्हेमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत हा सिरो सर्व्हे करण्यात आला. दिल्लीतील 11 जिल्ह्यांतून 27 जून ते 10 जुलै पर्यंत 21,387 नमुने घेण्यात आले. 23.48 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज मिळाल्यात. सर्वेक्षणानुसार दिल्लीत गेल्या 6 महिन्यात 23.48 टक्क्यांपेक्षा जास्त लोक कोरोनाने प्रभावित झाले. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत.

रिपोर्टनुसार दिल्लीची लोकसंख्या 2 कोटी असेल तर जवळपास 47 लाख लोकांना व्हायरसची लागण झालेली असू शकते. यापैकी बहुतेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत.