राजकारण

पंकजा मुंडे यांच्यासोबत कुठलाही वाद नाही-डॉ.भागवत कराड

21 July :- भाजपचे राज्यसभेचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड बुधवारी राज्यसभेची शपथ घेणार आहे. त्यासाठी ते आज दिल्लीत दाखल झाले. मार्च महिन्यात त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती. कराड हे गोपीनाथ मुंडे गटाचे नेते समजले जातात. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि बिल्डर असलेले संजय काकडे यांना डावलून भाजपने कराडांना राज्यसभेची जागा दिली होती.

कराडांची नियुक्ती करतांना पंकजा मुंडे यांना विश्वासात घेतलं नाही अशी राजकीय चर्चा नंतर सुरु झाली होती. त्यावर कराडांनी खुलासा करत असा वाद नसल्याचं स्पष्ट केलं.कराड म्हणाले, पंकजा मुंडे आणि माझ्यात कुठलाही वाद नाही. मला राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यानंतर पंकजा मुंडे यांचाही फोन आला होता. त्यामुळे त्यांना माझ्या उमेदवारीची माहिती होती. दिल्लीत येण्याआधीही त्यांनी मला शुभेच्छा दिल्या.


माझा फॉर्म भरतांनाही त्या उपस्थित होत्या त्यामुळे आमच्यात वाद असल्याच्या कुठल्याही गोष्टीत तथ्य नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. गोपीनाथ मुंडे यांचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे असंही ते म्हणाले.