बीड

बीडमधील “कोरोना योध्याचा” कोरोनामुळेच मृत्यु

बीड -बीड जिल्हा रुग्णालयात विशेष करून कोरोना उपचार विभागात रुग्णसेवा करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील एका 40 वर्षीय अधिपरिचरिकेचा कोरोना बाधित झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला,रुग्णालयात आणखी एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करण्याच्या 40 वर्षीय अधिपरिचरिकेस कोरोना कक्षात सेवा देत असताना कोरोनाची लागण झाली सोमवारी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला,तेव्हा त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते .

त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयातील त्यांचे सर्व सहकारी चिंतेत होते,अख्खी रात्र या सहकाऱ्यांनी,डॉक्टर लोकांनी जागून काढली,परंतु अखेर या कोरोना योध्याची लढाईत हार झाली अन मृत्यू विजय मिळवला
कोरोना योध्याचा मृत्यू होण्याची ही बीड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे .रुग्णसेवा अन आपल्या लाघवी स्वभावामुळे सुपरिचित असणाऱ्या या सहकाऱ्यांचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.

या अधिपरिचरिके सोबतच अन्य एका व्यक्तीचा कोरोनामुळे पहाटे मृत्यू झाला .बीड येथील 62 वर्षीय पुरुषावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते,रात्री उशिरा त्यांना व्हेंटिलेटरवर बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा पहाटे मृत्यू झाला .या दोन्ही मृत्यूमुळे कोरोना मृत्यूची संख्या एकोणीस झाली आहे.