सिनेमा,मनोरंजन

ए. आर. रेहमानसह अनेक दिग्गज देणार सुशांतला म्युझिकल ट्रिब्युट!

21 जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आघाडीचा अभिनेता सुशांत राजपूत सिंह यांनी नैराश्याला वैतागून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्या प्रकरणानंतर सुशांतचा चाहता वर्ग दुःखात बुडाला असून अद्यापही सुशांतच्या शोकातून बाहेर निघालेला नाही.जूनही सुशांत प्रत्येकाच्या आठवणीत आहे. सुशांतचं कुटुंबच नव्हे तर त्याचे मित्रमैत्री, चाहते आणि बॉलीवूड सेलिब्रिटींनाही त्याची आठवण येते आहे.

सुशांतच्या आठवणीत आता संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह दिग्गज गायक सुशांतला म्युझिकल ट्रिब्युट देणार आहेत.सुशांत सिंह राजपूतला म्युझिकल ट्रिब्युट देण्यासाठी डिज्नी हॉटस्टार आणि सोनी म्युझिक इंडियाने एक कार्यक्रमा आयोजित केलं आहे.

12 जुलैला दुपारी 12 वाजता सुशांतला म्युझिकल ट्रिब्युट दिलं जाणार आहे.ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याशिवाय गायिका श्रेया घोषाल, अरिजीत सिंह, मोहित चौहान, सुनिधी चौहान, शाशा तिरुपती, जोनिटा आणि हृदय गट्टानी यांचा या कार्यक्रमात समावेश असणार आहे.