राज्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ!
राज्यात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे प्रशासन आणि नागरिक पूर्णतः त्रस्त झालेले आहेत.अनेक युक्त्या लढवून देखील कोरोनाचं वादळ शमल्या जात नाहीये.मोठ्या मोठ्या महानगरात सुद्धा कोरोनाचा कहर सुरु आहे.राज्यात आजही कोरोनारुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 8240 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 3,18,695 एवढी झाली आहे. तर आज 176 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 12030 एवढी झाली आहे.
काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टेन्स ठेवा…प्रशासनाच्या सुचनेचं पालन करा!