सिनेमा,मनोरंजन

सुशांत आत्महत्या प्रकरण; पोलीस तपासात धक्कादायक माहिती!

21 जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांने नैराश्यास वैतागून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.सुशांतच्या कुटुंबा समवेत सुशांतचे मित्र,चाटे अजूनही सुशांतच्या आत्महत्या निर्णयामुळे आश्चर्याच्या धक्क्यात आहेत.सुशांतने आत्महत्या का केली या प्रश्नाचा शोध पोलीस घेत आहेत.अनेक मोठ्या सिनेकलावंतांची पोलिसांनी कसून चौकशी करत त्यांचा जवाब नोंदवला आहे.

सुशांतने आत्महत्येनंतर तो डिप्रेशनमध्ये होता ही माहिती समोर आली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी सुशांतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही चौकशी केली. सुशांत तब्बल चार डॉक्टरांकडून उपचार घेत होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.14 जून रोजी सुशांतने मुंबईतल्या वांद्रेत आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.

वांद्रे पोलिसांनी तीन मानसोपचार तज्ज्ञ आणि एका मानसशास्त्रज्ञांचा जबाब नोंदवला आहे.शांत 2018 साली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. परवीन दराईच यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून समुपदेशन घेत होता. मात्र सुशांत डॉ. परवीन यांच्या समुपदेशनाने समाधानी नव्हता. त्याने डॉक्टरांसहच वाद घातला आणि त्यानंतर उपचार अर्ध्यावरच सोडून दिले. पोलिसांनी डॉ. दराईच यांना सुशांतसह झालेल्या वादाबाबत तसंच सुशांतचं काऊन्सलिंग सेशन, समस्या, औषधाबाबत विचारणा केली आणि परवीन यांचा जबाब नोंदवून घेतला.याआधी मुंबई पोलिसांनी सुशांत उपचार घेत असलेले डॉ. केरसी चावडा आणि डॉक्टर पिंगळे यांची चौकशी केली होती. हे दोन्ही डॉक्टर सुशांतचं सातत्याने काऊन्सलिंग करत होते.

दरम्यान सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, ही मागणी जोर धरू लागली आहे. अभिनेता शेखर सुमन, भाजप नेत्या रूपा गांगुली, डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालला आहे. या प्रकरणी CBI चौकशीची गरज नाही, असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.