लोटसचा प्रताप आतापर्यंत तब्बल 22 पॉझिटिव्ह बीडला दिले
बीड,दि.20(प्रतिनिधी):- कोरोनाचे संकट बीडकरांवर गडद होत असताना गेल्या चार दिवसात बीडकरांना कोरोनाचा प्रसाद वाटण्याचा प्रताप केवळ शहरातील लोटस नावाच्या हॉस्पीटलने केला आहे. लोटसचा अर्थ कमळ हा असताना बीडमध्ये कोरोनाचे कमळ हे लोटसने फुलवले आहे.
सोमवारी बीड जिल्ह्यात धक्कादायक असा 50 जणांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बीडकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री आलेल्या पॉझिटिव्ह आलेल्या 26 जणांपैकी 12 जण हे लोटसचे कर्मचारी आहेत. त्यामध्ये एक मुख्य डॉक्टर, एक निवासी डॉक्टर तर 9 जण कर्मचारी तर एक जण रुग्णाचा नातेवाईक असे 12 जणांची टिम कोरोना निघाली आहे.