News

बीड- जिल्ह्यात 24 तासात तब्बल 50 नवे कोरोना रुग्ण

लोटस मधले बारा रुग्ण

बीड,दि.20(प्रतिनिधी):- कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेदिवस अधिक फोफावत आहे. बीड जिल्ह्याला कोरोनाने जणू काही घेरले आहे. रविवार आणि सोमवार या 24 तासात तब्बल 50 नवे कोरोनाग्रस्त निघाल्याचा अहवाल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात बीड शहरात 25,गेवराई तालूक्यात 7 तर पाटोद्यात 2, केज तालूक्यातील 5 आणि परळी 7 व अंबाजोगाई तालूक्यात 3 जणांना तर आष्टीत 1 जणाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.