बीड

श्रुतिका भोसलेचे नेत्रदीपक यश!

२० जुलै :- बीड येथील महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या श्रुतिका नितीन भोसले हिने नुकत्याच झालेल्या एच एस सी बोर्ड परीक्षेत अकाउंटन्सी विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन शालांत परीक्षेत 94.15 टक्के गुण मिळवून बलभीम महाविद्यालयातून प्रथम क्रमांक संपादन केला आहे.


बीडच्या बलभीम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या असलेल्या श्रुतिका भोसले हिने, 2018 च्या एसएससी बोर्ड परीक्षेत गणित आणि संस्कृत या विषयात 100 पैकी 100 गुणासह 98.60 टक्के गुण घेत आपल्या अभ्यासाची चुणूक दाखवली होती. नुकत्याच झालेल्या 12 वी कॉमर्सच्या परीक्षेत अकौंटन्सी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. त्याप्रमाणेच इंग्लिश- 89, हिंदी- 89, अर्थशास्त्र- 97, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट- 96, सेक्रेटरील प्रॅक्टिस- 93, तर एनविरोन्मेंट एज्युकेशन 50 पैकी 48 असे 650 पैकी 612 गुणासह 94.12 टक्के गुण मिळवून बलभीम महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

चार्टर्ड अकौंटंट होण्याचे स्वप्न नजरेत ठेऊन शिक्षण घेणारी श्रुतिका ही प्रा नितीन भोसले आणि जिजाऊ महिला ब्रिगेडच्या माजी जिल्हा कार्याध्यक्षा अनिता भोसले यांची कन्या आहे. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .व्ही .जी सानप, विजय सानप आणि उपप्राचार्य एस. एस. ढवळे, नंदकुमार शिंदे, डॉ दीपक शिंदे, गेवराई तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिनकर शिंदे आदींसह प्राध्यापकांनी श्रुतिकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
दै.झुंजारनेता,बीड