सुखद;कोरोनावरच्या लशीचे यशस्वी परिणाम!
२० जुलै :- जगभरातील कोरोना विषाणूच्या थैमानाने मोठे-मोठे देश हतबल झाले आहेत.कोरोना विषाणूचा वाढता कहर जगावरील सगळ्यात मोठे संकट बनला असून जगातील संपूर्ण आरोग्य विभाग,नागरिक कोरोना विषाणूमुळे त्रस्त झाले आहेत.दरम्यान आजपर्यंत कोरोनाविरुद्धच्या लढयातील सर्वात सुखद,आनंददायी बातमी समोर आली आहे.जगभरात कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता प्रभावी लस तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. Oxford Universityने कोरोनावर मात करण्याकरिता प्रभावी लस शोधली होती.शोधलेल्या लशीची मानवी चाचणी सुद्धा झाली होती. त्याचे परिणाम आज जाहीर करण्यात आले.
लशीची परिणाम सकारात्मक असून शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यातली ही सर्वात मोठी घटना समजली जाते.या औषधाचे कुठलेही घातक परिणाम आढळून आलेले नाहीत. त्याचबरोबर प्रतिकार शक्तीही वाढल्याचं दिसून आल्याची माहिती देण्यात आली आहे.ChAdOx1 nCoV-19 असं या औषधाला नाव देण्यात आलं आहे. 1,077 जणांना ही लस देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. हे परिमाण सकारात्म असले तरी आणखी काही चाचण्यांची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.