सिनेमा,मनोरंजन

शाहरुख खानने घेतला कोरोनाचा धसका!

२० जुलै :- हिंदी चित्रपट सृष्टी मधील महानायक म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला.अमिताभ यांच्या समवेत अभिषेक,ऐश्वर्या,आराध्या आणि अनुपम खेर यांच्या मातोश्रींना कोरोना विषाणूची लागन झाल्यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीत खळबळ उडाली आहे.तर सामान्य नागरिक आणखी जास्तच चिंतेत पडले आहेत.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सतत वादाच्या भौऱ्यात अडकणार अभिनेता शाहरुख खानने सुद्धा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची धसकी घेतली आहे.शाहरूख खान याने कोरोनाच्या भीतीने आपल्या मन्नत बंगल्याला प्लॅस्टिकने झाकून घेतलं आहे. खबरदारी म्हणून शाहरूखनं मन्नतच्या चारही बाजूंनी प्लॅस्टिक लावून घेतलं आहे.याच बंगल्यात शाहरूख आपली पत्नी गौरी आणि तीन मुलांसह राहतो.शाहरुख खानच्या या कृत्यामुळे नक्कीच शाहरुखच्या मनात धसकी बसल्याची लक्षात येत आहे.