महाराष्ट्र

लग्नामुळे झाला कोरोनाचा उद्रेक;17 जण पॉझिटिव्ह!

२० जुलै :- कोरोनाचा वाढता कहर चिंताजनक बनला आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे मुक्त संचार करण्यास बंधने पडली आहेत.मोठ्या महानगरात सुद्धा कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे प्रशासन,नागरिक त्रस्त आहेत दरम्यान पुणे येथील दौंड तालुक्यातील कासुर्डीमधल्या कोरोना पॉझिटिव्ह नवरा-नवरीमुळे एकाच कुटंबासह नातेवाईक मिळून तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.काही दिवसांपूर्वीच या जोडप्याचं लग्न झालं होतं. त्यांना त्रास जाणवू लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यातील आज सासरच्या कुटुंबातील लोकांच्या केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आज आला. दौंड तालुक्यातील एकाच दिवसांत 27 जण कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

कासुर्डी इथल्या नवरदेवाचे उरळी कांचन इथल्या नवरी मुलीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर नवरा-नवरीला त्रास होऊ लागल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली. ते दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सासरच्या 34 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये जवळच्या कुटुंबातील 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याची निष्पन्न झालं आहे.