भाजप नेत्यांचा शरद पवारांवर हल्लाबोल
20 July :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून पंतप्रधानांवर निशाणा साधत वक्तव्य केले होते की “काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल.” पवरांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातवरण ढवळून निघाले.पवारांनी केलेल्या या वक्तव्याबाबत भाजपच्या नेत्यांनी शरद पवारांवर हल्लोबोल केला आहे.
शरद पवारांनी केलेलं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी नाही, तर भगवान रामविरोधी आहे, असं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेते उमा भारती यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले काम इमानदारीने करतात. जर भगवान रामांसाठी त्यांनी दोन तास दिले, तर काही बिघडणार नाही, असं उमा भारती यांनी म्हटलं.
शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंदिर बांधल्याने कोरोना जाणर नाही ये देशाला माहित आहे. देशातील जनता सुज्ञ आहे. यावर अधिक बोलायची गरज नाही. मात्र मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही, तर आपल्या राज्यात मंत्र्यांना नव्या गाड्या दिल्याने कोरोना जाणार आहे का? शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने कोरोना जाणार आहे का? असा सवाल मुनगंटीवार यांनी शरद पवारांना विचारले. प्रत्येक गोष्टीचं राजकरण व्हायला नको असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.