ठाकरेंचे 2 सुरक्षा रक्षक कोरोनाच्या विळख्यात
20 July :- देशात सर्वत्र कोरोनाचा थैमान सुरु आहे.देशाबरोबर महाराष्ट्रातही कोरोनाने आपले साम्राज्य स्थापित केलेले आहेच .खबरदारी घेण्यात कमतरता पडली कि कोरोनाची लागण झाली असे गणित तयार झालेले दिसत आहे.मोठ्यात मोठ्या सेलिब्रेटी पासून सर्वच कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्र्यातील कलानगरस्थित असलेल्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करत 14 दिवसासाठी क्वॉरंटाईन केले होते.
आता पुन्हा एकदा मातोश्रीचं टेन्शन वाढलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तेजस ठाकरेयांच्या इतर सुरक्षा रक्षकांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली आहे.तेजस ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव असून त्यांना व्हाय प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्या ताफ्यातील दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांची तातडीनं चाचणी करण्यात आली आहे. तसेच इतर सुरक्षा रक्षकांना तातडीनं क्वॉरंटाईनही करण्यात आलं आहे.