महाराष्ट्र

4 ऑगस्टपासून शाळा होणार सुरु!

२० जुलै :- राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु आहे.दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन आणि नागरिक त्रस्त आहेत.अशा भयाण परिस्थितीमध्ये मुक्त संचार करणे देखील कठीण झालेले असताना शाळा कधी सुरु होणार हा सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या समोर आहे.दरम्यान एक महत्वाची घोषणा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. या दोन जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन वगळता 4 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात गरीब, आदिवासी मोठ्या संख्येने आहेत. 90 टक्के पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. त्यामुळं या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे गरीब आदिवासी मुलांचे वर्ष वाया जाऊ शकते. शाळा सुरु करताना नियमावली देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी ठिकाणी शाळा सुरू होणार आहेत. शाळामध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल, त्यांना मास्क उपलब्ध करून दिले जातील, अंतरावर बसवले जाईल, शाळा सॅनिटाईझ केल्या जातील, असं ते म्हणाले.

जिथे कंटेन्मेंट झोन आहे तिथे मात्र शाळा सुरू होणार नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.त्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात 80 टक्के शाळा सुरू होतील, तर चंद्रपूर जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के शाळा सुरू होतील, असं ते म्हणाले.