बीड

बीड-कोरोनाने घेतला पंधरावा बळी!

बीड -एकीकडे कोरोनाचे मीटर दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे बाधित रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढू लागले आहे.रविवारी एकाच दिवशी दोन जण मृत्युमुखी पडले तर सोमवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात आणखी एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला

गेवराई शहरातील फुलेनगर, मालीगल्ली या भागात राहणाऱ्या एका महिलेला गंभिर अवस्थेत 18 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सकाळी तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता सोमवारी दुपारी या महिलेचा उपचार सुरु असतांनाच मृत्यू झाला .गेल्या महिनाभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा आकडा आता पंधरावर गेला आहे .यामध्ये वृद्ध व्यक्तींचा आणि काही तरुण व्यक्तींचा देखील समावेश आहे.