लोटस हॉस्पिटलच्या पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यु
लोटस हॉस्पिटलच्या पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यु
बीड(प्रतिनिधी):- एकाच दिवशी 10 जण कोरेानाग्रस्त आढळून आलेल्या बीडच्या लोटस हॉस्पीटलमध्ये कोरोनाचा बळी गेला आहे. लोटसमध्ये चार दिवस दाखल असलेला रुग्णाला कोरोना असल्याचे सिध्द झाल्यानंतर त्याला औरंगाबाद मध्ये हलवण्यात आले होते. तेथील एका खाजगी रुग्णालयात त्याचे रविवारी निधन झाले.
बीड मधील राजीवनगर भागातील एक रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. आणि त्यानंतर लोटसमध्ये अन्य १० जणांना कोरोना झाला होता. बीडहून त्या रुग्णाला औरंगाबादच्या एम.जी.एम रुग्णालयात दाखल केले असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे बीड जिल्ह्यातील कोरोना मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे.