राज्यात कोरोनाचा मृत्यूदर घसरता;मात्र रुग्णवाढ कायम
18 July :- राज्यात कोरोनाचा कहर जरी सुरु असला तरी मृत्युदर कमी होतं असल्याने मनाला दिलासा मिळत आहे.मात्र राज्यात दिवसेंदिअव्स कोरोनाबाधित रुग्णाची झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या येणाऱ्या काळात मोठ्या संकटाचे संकेत देत आहे. राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,00,937वर गेली आहे. तर एकूण मृत्यू 11596 एवढे झाले आहेत. कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.