महाराष्ट्र

कोरोना लशीच्या चाचणीसाठी महाराष्ट्रात 60 जण तयार!

18 July :- कोरोना विषाणूने जगभरात आपले थैमान घातले आहे.अशा परिस्थितीत जगभरात कोरोना विषाणूंवर मात करण्याकरिता प्रवाभी लास तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.दरम्यान हैदराबादच्या भारत बायोटेकच्या वतीने कोवॅक्सिनची निर्मिती केली जात आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (NIV) सहभागातून ही लस विकसित केली जात आहे. याला ICMR ने मान्यता दिली आहे आणि पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे.

पहिली लस बिहारमध्ये पाटण्यातल्या एम्स रुग्णालयात टोचण्यात आली. त्यानंतर हरियाणातही काही जणांना लस देण्यात आली. हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीजीआय रोहतमध्ये कोरोना लस कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. 17 जुलैला तीन जणांना ही लस देण्यात आली. लशीचा त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही.

महाराष्ट्रातल्या काही स्वयंसेवकांवरही या लशीचा प्रयोग होणार आहे. त्यासाठी स्वेच्छेने नोंदणी केलेल्या 60 निरोगी व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. नागपूरच्या रुग्णालयात याची चाचणी होईल.नागपूर इथल्या डॉ. चंद्रशेख गिल्लूरकर यांच्या गिल्लूरकर हॉस्पिटलची महाराष्ट्रातल्या चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. तिथे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या चाचण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.