राम मंदिराच्या भूमिपूजनची ठरली तारीख
18 July :- भारत देशातील राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराचा राजकारण गाजत आला आहे.राम मंदिराचे वादरुपी वादळ शमले असून राम मंदिर उभारणीची अंमलबजावणी होताना सध्या दिसत आहे.अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीचं काम तीन किंवा पाच ऑगस्टला सुरू होऊ शकते. आज अयोध्येमध्ये मंदिर निर्माण ट्रस्टची एक महत्वाची बैठक झाली, त्यानंतर या दोन तारखांचा प्रस्ताव भूमिपूजनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला गेला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन व्हावं, अशी इच्छा राम जन्मभूमी न्यासनेही व्यक्त केली होती.
फेब्रुवारी महिन्यातच खरंतर या ट्रस्टची बैठक होऊन रामनवमीपर्यंत काम सुरू होणार होतं. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ते लांबणीवर पडलं. त्याखेरीज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आता मंदिर निर्मितीच्या कामाला सुरुवात होईल. कोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या राम मंदिर निर्माण ट्रस्टमध्ये एकूण पंधरा सदस्य आहेत. त्यापैकी 12 सदस्यांनी आज अयोध्येतल्या या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावली तर तीन सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते.
पंतप्रधानांचे माजी मुख्य सचिव रुपेंद्र मिश्रा यांचादेखील या समितीत समावेश आहे. मंदिराच्या एकूण बांधकामाबद्दलची चर्चा सुद्धा या बैठकीत झाल्याचे कळते आहे. त्यानुसार तीन ऐवजी पाच घुमट असावेत आणि मंदिराची उंची 161 फूट असावी अशा पद्धतीचीही चर्चा या बैठकीत झाली आहे