क्राईम

बाप नव्हे साप अखेर तिने ठेचलाच!

१८ जुलै :- जगामधील अनेक प्रेमळ नात्यांमधील सर्वात प्रेमळ आणि पवित्र नातं असते ते म्हणजे मुलगी आणि बापाचे या नात्याला कलंकित करणारा घटना नाशिक येथे घडली आहे.आरोपी असणाऱ्या मुलीने आकाश शिंदे या तरुणासोबत चार महिन्यांपूर्वी प्रेम केला होता.संचारबंदीच्या काळात हे जोडपं नाशिकमध्ये राहण्याकरिता आले होते.आरोपी मुलीला चार महिन्याचा मुलगा आहे.पती आणि मुलासह आरोपी मुलगी सावत्र वडिलांच्या घरी राहण्याकरिता अली होती.

मुलगी आपल्या चार महिण्याच्या बाळासोबत घरात एकटी असताना मुलीचे वडील चिंतामण बोर्डे यांनी मुलीची छेड काढण्यास सुरवात केली.आपल्या मुलीवरच अतिप्रसंग करण्यास सुरवात केली. या झटापटीमध्येच आरोपी मुलीच्या वडिलांना दुखापत झाली असता मुलीचे वडील खाली जमिनीवर पडले.जमीनींवर पडलेल्या बापाच्या गळयावर जोराने पाय देऊन बापाची जीवनयात्रा मुलीने कायमची संपवली.

नाशिक रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित आरोपी तरुणी स्वत: आपल्या पतीसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि वडिलांचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.