महाराष्ट्र

राज्यात कोरोना रुग्णांची विक्रमी भर

17 July :- कोरोना विषाणूच्या कहराने त्रस्त असणारे राज्य दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढणाऱ्या विक्रमी संख्येमुळे चिंतेत आहे.गेल्या 24 तासांमध्ये 8308 कोरोना रुग्णांची भर पडली. तर राज्यात आज 285 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 92 हजार 589 एवढी झाली आहे.

राज्यात 1, 20,480 Active रुग्ण आहेत. आज 2217 जणांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 60 हजार 357 एवढी झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील 2-3 दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील, त्यानंतर शहरात पुन्हा लॉकडाऊन करायचा की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!
दै.झुंजारनेता,बीड