क्राईम

उस्मानाबादचा प्रेमी पाक सीमेवर अटकेत!

July :- प्रेमामध्ये आणि यद्धामध्ये सर्व काही क्षम्य असते.याच पार्श्वभूमीवर कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता अनेक संकटांना तोंड देत कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाउन असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील झिशान चौधरी आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता.सोशल मिडीयावर एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या झिशान चौधरी या बहाद्दराने थेट दुचाकीवरून पाक बॉर्डर गाठली.मात्र या 20 वर्षीच्या तरूणाला भारत-पाक सीमेवर अटक करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील झिशान चौधरी या 20 वर्षीय तरुणास रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.झिशान चौधरी आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. मात्र देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

झिशानने दुचाकी घेऊन गुजरातच्या भूजमध्ये बॉर्डर गाठली. वाळूत दुचाकी फसल्याने मग हा पठ्ठ्या थेट पायी निघाला होता. पण बॉर्डरवर असलेल्या जवानांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
दै.झुंजारनेता,बीड