महाराष्ट्र

पार्लेजी कंपनीत कोरोनाचा शिरकाव!

16 July :- राज्यात सर्वत्रच कोरोनाचा कहर सुरु आहे.जिल्ह्यामध्ये,शहरांमध्ये,ग्रामीण भागात,गल्ल्यांमध्ये कोरोनाचा विषाणूचा शिरकाव झाला आहे.मुंबई,पुण्यासारख्या मोठ्या महानगरात सुद्धा कोरोनाच थैमान सुरु आहे.नाशिकमधील एका नामांकित बिस्किट उत्पादक कंपनीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

पार्ले जी कंपनीतील 6 कामगारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.संबंधित कर्मचारी काम करीत असलेला विभाग आता प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.कोरोनाने आता थेट औद्योगिक वसाहतीत शिरकाव केल्यानं कामगार वर्गात मोठी दहशत पसरली आहे.

काळजी घ्या…गर्दी टाळा…मास्क वापरा…सोशल डिस्टन्स ठेवा…प्रशासनाच्या सूचनेचं पालन करा!
दै.झुंजारनेता,बीड