राज्यात भेटली अनेक रुग्णांना कोरोनामुक्तीची पावती!
16 July :- राज्यात आजही कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे.आरोग्य विभागाच्या अहोरात्र मेहनती नंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.सर्वांच्या मनाला दिलासा देणारी माहिती आहे की कोरोनाचा कहर जरी राज्यात सुरु असला तरी राज्यात रुग्ण बरे होण्याची आकडेवारी चांगली आहे.राज्यात आज 5527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आतापर्यंत 1,58,140 रुग्णांनी कोरोनावर मात करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 1,14,648 अॅक्टीव केसेस आहेत.राज्यात आज 8641 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर तब्बल 266 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2,84,281 वर गेली आहे.