Popular News

जगाला कोरोना लस पुरवण्यात भारत सक्षम-बिल गेट्स

संपूर्ण जगाला सूक्ष्म कोरोना विषाणूने गुदगे टेकवण्यास मजबूर केले आहे.सर्वत्रच कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनत चालली आहे.जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरस विरोधातील लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. बहुतेक देशांच्या प्राण्यांवरील चाचण्या यशस्वी झाल्यात. तर काही देश मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. भारताही दोन औषध कंपन्यांच्या लशींना ह्युमन ट्रायलची परवानगी मिळाली आहे.

एका लशीचं ह्युमन ट्रायल सुरूदेखील झालं. दरम्यान कोरोनावरील लस तयार झाली तर फक्त स्वत:पुरतीच नव्हे तर संपूर्ण जगाला लस पुरवण्याची क्षमता भारताकडे आहे, असा विश्वास मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी दाखवला आहे.बिल

गेट्स म्हणाले, “भारतामध्ये खूप क्षमता आहे. इथल्या औषध आणि लस कंपन्या संपूर्ण जगाला मोठ्या संख्येनं पुरवठा करतात. सर्वात जास्त लशी भारतातच तयार करण्यात आल्या आहेत. भारतील औषध आणि लस कंपन्या संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात लशीचा पुरवठा करतात. सीरम इन्सिट्युसारख्या मोठ्या कंपनीप्रमाणेच बायो ई, भारत बायोटेकसह कित्येक कंपन्या कोरोनावरील लस बनवण्यात मदत करत आहेत”