राजकारण

शिक्षकांच्या ऑफलाईन बदलीवर सरकारने पुनर्विचार करावा- पंकजा मुंडे

राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि शोषण होईल.गोरगरीब शिक्षकांना दुर्लक्षीत केले जाईल, मेरीट सोडून ज्यांच्याकडे वशीला आहे अशाच शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल, पारदर्शकता राहणार नाही असं म्हणत ऑफलाईन होणाऱ्या बदली प्रक्रिया निर्णयाचा पुर्नरविचार करावा असे राज्य सरकारने माजी मंत्री पंकजा मुंडे ट्रिटद्वारे सांगितले.


माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी एक ट्विट केलं, कोरोनाच्या धर्तीवर शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असे ऐकले, ज्यांचा वशिला नाही, वाली नाही आणि त्या गरीब शिक्षकांसाठी हा ऑनलाईनचा निर्णय कोरोनाच्या संकटात आणखी संकटे आणेल. राज्य सरकारने यावर पुर्नरविचार करावा पारदर्शकता आणि मेरीट सोडून भ्रष्टाचार व शोषण होईल अशा आशयाचे ट्रिट पंकजा यांनी केले.भाजपाच्या काळात राज्यातील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन प्रक्रिये द्वारे होत होत्या.आता त्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे बोलले जाते. यावर पंकजा मुंडेंनी हे ट्विट केलं.

ऑफलाईनमुळे बदली प्रक्रियेमुळे पारदर्शकता आणि मेरीट राहणार नाही. भ्रष्टाचार आणि शोषण होईल अशी भिती पंकजांनी व्यक्त केली. ज्यांचा कोणी वाली नाही. वशिला नाही अशा शिक्षकांना त्रास होईल त्यामुळे सरकारने या निर्णयाचा पुर्नरविचार करावा असेही आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे