सिनेमा,मनोरंजन

रिया चक्रवर्तीची अमित शहांना हात जोडून मागणी!

16 July :- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय असणाऱ्या आघाडीचा अभिनेता सुशांत राजपूत सिंह यांनी नैराश्यास वैतागून गळफास घेतला.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी लोटला आहे.पोलिसांनी अनेक व्यक्तींची कसून चौकशी केली आहे.मात्र अद्यापही सुशांतच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होऊ शकले नाही.सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. रियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना याबाबत विनंती केली आहे.रियाने इन्टाग्रामवर सुशांतसिंह राजपूत आणि तिचा फोटो शेअर करत लिहिलं की, “अमित शाह सर, मी सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती. सुशांतच्या मृत्यूला आता एक महिना झाला आहे. मला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. तरीही न्यायासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी. मला केवळ हे जाणून घ्यायचं आहे की सुशांतने कोणत्या दडपणाखाली हे टोकाचं पाऊल उचललं.”