‘या’ दोन देशांच्या कोरोना लस पोहचल्या अंतिम टप्प्यात, अशी आहे मेड इन इंडिया लशीची स्थिती
नवी दिल्ली, 16 जुलै : कोरोनावर उपायकारक लस (Corona vaccine) शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहे. कोरोनाची लस बाजारात कधी येणार, याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. दरम्यान काही लशी या मानवी चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात आहेत, तर काहींच्या चाचण्या सुरू आहेत.
जगभरात सध्या 100हून अधिक कोरोना लशींचे ट्रायल सुरू आहे. यातील 19 लस या ह्यमुन ट्रायलपर्यंत पोहचल्या आहेत. सध्या केवळ 2 लस या अंतिम निकालापर्यंत पोहचल्या आहेत. यातील पहिली लस आहे चीनची सायनोफार्माची लस आणि दुसरी ऑक्सपर्ड विद्यापीठाची लस.
सगळ्यात पुढे आहे ऑक्सफोर्ड विद्यापीठाची (Oxford University) लस. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सर्वात प्रथम मानवी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. ब्राझीलमध्ये करण्यात आलेल्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांमध्ये व्हायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करण्यात आली आहे. ऑक्सपर्ड विद्यापीठाची लस ChAdOx1 nCoV-19 (AZD1222) पूर्णपणे तयार होण्याचा मार्गावर आहे. ही लस सप्टेंबर 2020 पर्यंत बाजारात उपलब्ध होऊ शकके, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतात या 2 लशीचे ट्रायल सुरू
भारतात 2 लशींचे ट्रायल सुरू आहे. भारतीय औषधी कंपनी जायदस कॅडिलाने (Zydus Cadilla) बुधवारी सांगितले की त्यांनी संभाव्य कोरोना लसीसाठी मानवी चाचणीला (Human Trial) सुरू केल्या आहेत. तसेच भारत बायोटेक कंपनीची COVAXIN य़ा लशीचीही मानवी चाचणी सुरू आहेत. या दोन्ही मेड इन इंडिया लस डिसेंबर 2021 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लशीचे उत्पादन दोन भारती कंपन्या AstraZeneca आणि सीरम या करत आहेत.
मॉडर्नाची पहिली चाचणी यशस्वी पार
अमेरिकन कंपनी मॉडर्ना (Moderna) कोरोनाव्हायरस लसने पहिली चाचणी यशस्वी पार केली आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले निकाल आले आहेत. या लसीने प्रत्येक व्यक्तीमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अॅंटिबॉडिज तयार केली आहेत. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या लसीचे कोणतेही साइड इफेक्ट दिसून आलेले नाही आहेत.
रशियाच्या लशीची क्लिनिकल चाचणी पूर्ण
रशियानं कोरोनाची लस तयार असल्याचा दावा केला आहे. हा दावा खरा असला तरी, ही लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने ही लस तयार केली आहे. मानवी परीक्षणामध्ये ही लस यशस्वी ठरली आहे. रशियानं तयार केलेल्या या लसीने क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. मात्र असे असले तरी हा केवळ पहिला टप्पा आहे. सोमवारपासून या लसीच्या ट्रायचा दुसरा टप्पा सुरू झाला. त्याचा निकाल येणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे पहिला टप्पा या लसीनं पार केला असला तरी, बाजारात उपलब्ध होण्यासाठी अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.